शिवसेनेच्या पाठपुराव्याने स्ट्रीट लाईट व विजेचा पुरवठा झाला सुरळीत


शिवसेनेच्या पाठपुराव्याने स्ट्रीट लाईट व विजेचा पुरवठा झाला सुरळीत 
पनवेल दि.३० (वार्ताहर) : शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील संत गोरा कुंभार मंदिर परिसरातील स्ट्रीट लाईट तसेच कुंभार वाडा मधील विजेचा पुरवठा सुरळीत झाला आहे. या कामाचे लोकार्पण शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.             पनवेल शहरातील कुंभारवाडा येथील संत गोरा कुंभार मंदिर परिसरातील स्ट्रीट लाईट तसेच कुंभार वाडा मधील नवनाथ मंदिर जवळ बसवलेले हॉल्टेज चा सुरळीत पुरवठा होण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दोन्ही कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त याकामाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


 यावेळी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, उपशहर प्रमुख मचींद्र झगडे, वार्ड क्रमांक १४ चे विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, शाखाप्रमुख किरण कळवेकर, उप शाखाप्रमुख प्रतिक वाजेकर, युवासेना प्रमुख रितेश पनवेलकर, शाखा प्रमुख ओंकार पनवेलकर आदी शिवसैनिक व कुंभार वाड्यातील तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने