उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )
कोकण भागात एका खेडेगावातून आपले भवितव्य आजमावण्यासाठी आलेले दैनिक महानगरीचे टाइम्स चे मुख्यसंपादक तथा मालक, सदाशिव केरकर यांचे मुंबईमध्ये आकस्मित निधन झाले आहे.मुंबई उपनगरातील गोरेगाव येथे दैनिक महानगरी टाईम्सचे अद्यावत कार्यालय सुरू करून दैनिक महानगरी टाइम्स हे मराठी वृत्तपत्र मुंबई सारख्या ठिकाणावरून यशस्वीरित्या चालवणारे, उमदे, मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व, सदाशिव केरकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले
. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक पत्रकार, संपादक यांना आश्चर्याचा बसलेला आहे. केरकर हे एका कामानिमित्त मालवण येथे हॉटेल मध्ये वास्तव्यास असताना एक छोटाशा अपघात झाला. त्यामुळे त्यांना मुंबई मधील मधील बांद्रा (वेस्ट )येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना दिनांक 5 जुलै 2023 रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.पत्रकारिता क्षेत्रात प्रसिद्ध असलेले संपादक सदाशिव केरकर यांचे दुःखद निधन झाले. या निधनाची वार्ता समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आले. संपादक सदाशिव केरकर यांचा अंत्यविधी मुंबई येथील स्मशानभूमीमध्ये करण्यात आले असून त्यांच्या अंत्यविधीला विविध वृत्तपत्राचे पत्रकार, संपादक, पेपर विक्रेते, राजकीय, सामाजिक धार्मिक व अन्य क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
उरण