रेल्वे प्रवासामध्ये मोबाइल चोरीच्या वाढल्या घटना


रेल्वे प्रवासामध्ये मोबाइल चोरीच्या वाढल्या घटना
पनवेल दि.०६ (वार्ताहर) : रेल्वे प्रवासामध्ये मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रेल्वे प्रवासात भारतीय सैन्य दलामधील जवानाचा मोबाईल चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           सैन्य दलात कार्यरत असलेला ऋतुराज कदम हा तरुण सांगली येथील आपल्या घरी जाण्यासाठी निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून पनवेलला येणाऱ्या एक्स्प्रेसने प्रवास करत होता. मात्र या प्रवासादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ६४ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरी करून नेला. तर दुसऱ्या घटनेत सांगलीच्या मतुस्कान शेख या विद्यार्थिनीचा दादर-हुबळी एक्स्प्रेसमधून २३ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीला गेला आहे. त्याचप्रमाणे इंदोर कोचिवली एक्स्प्रेसमध्ये ललित दाभोळकर यांचा ३८ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरीला अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. या तीनही घटनांविषयी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने