खारघरमध्ये एका घरातून ड्रग्स विक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती मिळाली असता खारघर पोलीसांनी तात्काळ धाड टाकत कारवाई केली. मात्र कारवाई करतेवेळी एका नायजेरियन नागरिकाने पोलीस कारवाईला प्रतिकार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ आणि त्यांच्या टीमने सिने स्टाईल पाठलाग करत आरोपीचा प्रतिकार धुडकाऊन लावत त्याला अटक केली. यावेळी आरोपीसोबत पोलिसांची मोठी झटापट झाली असून तब्बल 2 तासांनी आरोपीला अटक करण्यात यश आले. या कारवाईत खारघर पोलिसांनी 2 महिला व 2 पुरुष अश्या चार नायजेरियन नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 30 लाखांचे मेथाक्युलन ड्रग जप्त केले.
Tags
खारघर