माथेरानच्या डोंगरावरून दरड कोसळली

माथेरानच्या डोंगरावरून दरड कोसळली

माथेरानच्या डोंगरावर दरड कोसळली असल्याची घटना 25 जुलै रोजी घडली असल्याची माहिती धोदाणी येथील ग्रामस्थांनी दिली. याची माहिती तात्काळ प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन या ठिकाणी हजर झाले व सावधानता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माथेरानच्या मंकी पॉईंटच्या खालील माती दोन दिवसांपासून खाली कोसळत आहे. त्यामुळे गाढी नदीतील पाणी लाल झाले आहे. 25 जुलै रोजी सकाळपासून माथेरानच्या डोंगरावर मोठा आवाज होत असल्याने येथील ग्रामस्थ घाबरले.
थोडे नवीन जरा जुने