श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वितरण






श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वितरण  
पनवेल दि.१६ (संजय कदम) : श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भिवंडी चिंबीपाडा येथील आदिवासी विकास विभाग शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील १५० मुलींना शैक्षणिक साहित्य व सेनिटरी नॅपकिन सहीत खाऊ वाटप करण्यात आले 


 
           यावेळी शाळकरी विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक यांनी संस्थेचे पदाधिकारी यांचे स्वागत केले तसेच शाळेच्या वतीने आभार आणि शुभेच्छापत्र दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश बासुतकर, सचिव वैभव पारकर, मार्तंड मगर, कु मिथिल बासुतकर, मुख्यध्यापक एस के पाटील, अधीक्षक महादेव भंडारी, अधिक्षिका माधुरी लोखंडे उपस्थित होते. यावेळी मराठा प्रतिष्ठान सामाजिक संस्था आणि श्री गणेश वैष्णवी सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी उपयोगी पडणारे साहित्य, नोटबुक, वितरण करून विद्यार्थिनीसह जेवणाचा आनंद घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश बासुतकर यांनी आम्हाला ही आमचे बालपण, आणि शाळेचे दिवसाची आठवण झाली असून यापुढेही अश्याप्रकारे सामाजिक कामे करत राहण्याचे आश्वासन दिले.



थोडे नवीन जरा जुने