कामोठे कॉलोनी फोरमच्या दणक्याने मानसरोवर रेल्वे स्थानकातील गळके पत्रे दुरुस्तीच्या कामाला सुरवात


कामोठे कॉलोनी फोरमच्या दणक्याने मानसरोवर रेल्वे स्थानकातील गळके पत्रे दुरुस्तीच्या कामाला सुरवात
पनवेल दि.१६ (वार्ताहर) : मानसरोवर रेल्वे स्थानकात स्टेशनचे पत्रे गळत असून मुसळधार पावसामध्ये धबधब्यासारखे पाणी ह्या पत्र्यांमधुन पडत आहे. त्यामूळे प्रवाशांना याचा नाहक त्रास होत यासंदर्भात कामोठे कॉलोनी फोरमने सिडको कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन सात दिवसांच्या आत या गळक्या पत्र्यांची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा जनआंदोलनाच्या इशारा दिला होता. कामोठे फोरमच्या दणक्यानंतर सिडकोने मानसरोवर तसेच खान्देश्वर रेल्वे स्टेशनवरील गळक्या पत्र्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.   


 
           मानसरोवर रेल्वे स्थानकाची परिस्थिती अत्यंत दयनीय असुन पावसाचे पाणी प्लेटफॉर्मवर आले आहे. स्टेशनवरील गळक्या पत्र्यांमुळे मुसळधार पावसामध्ये धबधब्यासारखे पाणी या पत्र्यांमधुन पडत आहे. त्यामूळे प्रवाशांना त्रास होत असुन ह्या बाबत अनेक तक्रारी कामोठे कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. रेल्वे स्थानकांची मागील वर्षाची परिस्थिती बघता सिडको कडून पावसाळयापुर्वी रेल्वे स्थानकांतील पत्र्यांची दुरुस्ती करणे अपेक्षीत होते परंतु दुर्देवाने सिडकोकडून कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे प्रवाशांना दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा स्टेशन वर अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ओल्या प्लेटफॉर्म मुळे घाईगडबडीत असताना एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. स्टेशन वरील विद्युत उपकरणांचा वीज प्रवाह लिक होऊन पाण्याच्या माध्यमातून प्रवाहीत झाल्यास मोठी जिवितहानी होऊ शकते


. त्यामुळे या नागरी समस्येची दखल घेऊन सात दिवसाच्या आत गळक्या पत्र्यांची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा जनआंदोलनाचा करू असा इशारा कामोठे कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव यांनी सिडकोला दिला होता. कामोठे फोरमच्या या दणक्यानंतर सिडकोने मानसरोवर तसेच खान्देश्वर रेल्वे स्टेशनवरील गळक्या पत्र्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. याबद्दल नागरिकांनी कामोठे कॉलनी फोरमचे आभार मानले आहे. थोडे नवीन जरा जुने