भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड- "मुंबई उरण पाइपलाइन" विभागामार्फत स्वच्छता पखवाडा-२०२३ साजरा.






भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड- "मुंबई उरण पाइपलाइन" विभागामार्फत स्वच्छता पखवाडा-२०२३ साजरा.

पनवेल दि १२ /प्रतिनिधी
भारत पेट्रोलियम कंपनीच्या 'एमयुपीएल' पाईपलाईन विभागातर्फे व्यावसायिक आणि सामाजिक जाणिवेतून विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेची तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक शाळा, फुंडे ता. उरण येथे "स्वच्छता पखवाडा-२०२३" आयोजित करण्यात आला.



यावेळी भारत पेट्रोलियम चे वरिष्ठ प्रबंधक संदीप टकले, , एमयूपीएल मंगेश जाधव, सहाय्यक प्रबंधक, रविंद्र कटकदौंड, प्रबंधक तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या विधायक कार्यक्रमास भारत पेट्रोलियम अधिकारी वृंद कार्यकारी संचालक, प्रदीप गोयल उपस्तिथ होते

यावेळी मुख्य महाव्यवस्थापक संजीव काकन , विभाग प्रमुख (पश्चिम क्षेत्र) नीलेश तिमोथी, ह्यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
'एमयूपीएल' पाईप लाईन विभागाकडून प्रभात फेरीचे आयोजन केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.




वृक्षारोपण, वृक्ष रोप वाटप केले। आणि वृक्ष रोपणाचे वातावरण आणि आरोग्यासाठी चे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांसाठी स्लोगन, चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन केले.
शाळेच्या वापरासाठी ज्यूट बॅग, कचरा कुंडी, झाडू तसेच विद्यार्थ्यांसाठी स्यानीटायझेशन किट चे वाटप करण्यात आले. ह्या प्रसंगी शाळा व्यवस्थापनाने 'बीपीसीएल' कंपनीचे मनापासून आभार मानले. तसेच प्लास्टिक चा वापर टाळण्यासाठी शपथ घेतली तसेच विद्यार्थी, शिक्षक तसेच उपस्थितांना पेट्रोलियम पाइपलाइन चे महत्व आणि सुरक्षे संदर्भात माहिती देण्यात आली.

                                    

थोडे नवीन जरा जुने