आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेली "आमदार चषक -२०२३" फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेली "आमदार चषक -२०२३" फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यात आमदार चषक २०२३ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.१५ वर्षा खालील फुटबॉल स्पर्धा आमदार चषक- उरण स्वातंत्र्यसैनिक दत्ता रहाळकर मैदान उरण बोरी आणि आणि ओपन फुटबॉल स्पर्धा सावरकर मैदान लाल मैदान उरण येथे आयोजित करण्यात आली तरी सदर स्पर्धेला ९, ११, १३, १५ वर्षा खालील स्पर्धेसाठी १६ टीम आणि ओपन स्पर्धेसाठी १० टीम येऊन स्पर्धेचे महत्व वाढवलं . या वेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर आणि उरण नगरीचे नगराध्यक्ष सायली ताई म्हात्रे यांनी उदघाटन केले. उत्तम नियोजन, आयोजन असल्याने आमदार चषक २०२३ उत्तम रित्या यशस्वीपणे, उत्तम प्रतिसादात संपन्न झाली.फुटबॉल स्पर्धेसाठी विशेष मेहनत व सहकार्य करणारे सेव्हेन स्टार फुटबॉल अकॅडेमी उरण अध्यक्ष व हेड कोच प्रविण संग्राम तोगरे, असिस्टेन्ट कोच व डब्लू.आय. एफ.ए चे रेफरी तनिष्क प्रविन तोगरे, नंदिनी प्रविन तोगरे, राकेश केळकर, रोहन म्हात्रे, मनीषा भोईर व सेव्हेन स्टार फुटबॉल अकॅडेमीचे समस्त विध्यार्थी वर्ग आणि एम सी मस्टंगस फुटबॉल ग्रुप सदस्य निहाल तावडे, आनंद गुप्ता ,आकाश शहा ,प्रणित पाटील, हिमांशू इत्यादी सहकाऱ्यांनी सहकार्य करून आमदार चषक २०२३ उत्कृष्ट रित्या पार पाडले . या वेळी आयोजक - रायगड भूषण विशाल पाटेकर अध्यक्ष - मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण यांनी सर्वांचे आभार मानले 


थोडे नवीन जरा जुने