एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत अपघाती निधन झालेल्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना करण्यात आली आर्थिक मदत.







एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत अपघाती निधन झालेल्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना करण्यात आली आर्थिक मदत.
सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा उपक्रम सर्वत्र राबविण्याची गरज.



उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )दि. २२/०६/२०२३ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास उरण तालुक्यातील करळ फाटा जवळील पुलावर एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघाता मध्ये मे. मॅन लॉजिस्टिक (ई) प्रा. लि. या कंपनी मध्ये काम करणारे अविनाश घोगरे (वडील) वय वर्ष ४८. आणि कु. कौशल अविनाश घोगरे (मुलगा) वय वर्षे २४. या दोघांचे अपघाती निधन झाले.या अपघातात एकाच वेळी वडील व मुलाचे अपघाताने निधन झाले. 



त्यामुळे घरातील कर्ता व्यक्ती वडील व त्यासोबत त्या घरातील भविष्यातील आई वडिलांचा आधार असलेला मुलगा सुद्धा एकाच वेळी मृत्यू पावल्याने घोगरे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले होते.त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने काम करून हे कुटुंब आपले चारितार्थ चालवत होते.मात्र या दुःखाच्या संकटात अनेक लोकांनी त्यांच्या मित्र वर्गांनी तसेच त्यांच्या कामावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निधी जमा केला. प्रत्येकाने स्व इच्छेने निधी दिली त्यातून जमा झालेली रक्कम घोगरे कुटुंबियांना देण्यात आली. 



मृत व्यक्ती कै. अविनाश घोगरे, कै. कु. कौशल घोगरे हे उरण मध्ये सीएचए(कस्टम हाऊस एजेंट)चे काम करत होते. कस्टम हाऊस एजेंटचे एखादी अपघाती निधन झाले किंवा कोणत्याही कारणाने निधन झाल्यास त्यांना शासनाकडून कोणतेही आर्थिक लाभ, सुख सुविधा किंवा कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत सर्व (सी एच ए बांधव , शिपिंग कंपनी कर्मचारी,सीमा शुल्क अधिकारी आणि मित्र परिवार ) यांनी घोगरे कुटुंबियांना एक आधार म्हणून आर्थिक स्वरूपात मदत Rs.5,27,768 (ऑनलाईन )+ Rs.2,43,650/-(रोख )=एकूण Rs.7,71,418/-रक्कम जमा झालेली होती.ही आर्थिक मदत कौशल घोगरे यांच्या मातोश्री प्रणाली अविनाश घोगरे यांना दिनांक 08-07-2023 या तारखे





 (Rs.1,66,700(रोख)+Rs.2,09,034(चेक)=.एकूण Rs.3,75,734/-) देण्यात आली आणि अविनाश घोगरे यांच्या मातोश्री सुमन महादू घोगरे यांना दिनांक 16-07-2023 या तारखेस (Rs.76,950(रोख )+Rs.3,18,734(चेक )=एकूण Rs.3,95,684/-)या स्वरूपात देण्यात आलेली आहे.वरील रक्कम देताना न्हावा शेवा (जेएनपीटी) पीयुबी येथे काम करणारे कैलास कुमकर,दीपक चौधरी,ज्ञानेश्वर घोगरे,दत्तात्रय चौधरी,विक्रम चौधरी व एक्स्पोर्ट डॉक मधुन लहू डुकरे,योगेश वाळुंज आणि इम्पोर्ट डॉक मधून शब्बीर शेख,बबन वाळुंज व ग्रामस्थ विजय घोगरे,विकास ढोले हे उपस्थित होते.ज्यांनी ज्यांनी या उपक्रमा मार्फत आर्थिक मदत केली, वेळात वेळ काढून सेवा केली आणि या सामाजिक उपक्रमात भाग घेतला त्या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आले.ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्राथर्ना यावेळी सर्वांनी केली.जिथे शासनाची सुद्धा मदत पोहोचली नाही तिथे सर्व प्रतिष्टीत व्यक्ती, कर्मचारी अधिकारी वर्ग, सीएचए बांधव, मित्र परिवार यांनी एकत्र येत राबविलेला एक हात मदतीचा हा उपक्रम निश्चितच कौतुस्कापद आहे. निदान हा असा उपक्रम सर्वत्र राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून एखाद्या घरातील कर्ता करविता व्यक्तीचे निधन झाल्यास त्या कुटुंबातील व्यक्तीला निदान आर्थिक स्वरूपाचा तरी आधार मिळेल.


थोडे नवीन जरा जुने