मा. नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने विद्युत पुरवठा झाला सुरळीत






मा. नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने विद्युत पुरवठा झाला सुरळीत
पनवेल दि. १७ ( संजय कदम ) : पनवेल महानगरपालिकेचे भाजपचे कार्यसम्राट मा. नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने शहरातील सागर हॉटेल जवळ बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे . 


                 शहरातील मिडल क्लास सोसायटी सागर हॉटेल जवळ एम एस ई बी ची डीपी रस्त्यावर तुटून पडली होती.त्यावेळी तेथून माजी नगरसेवक राजू सोनी जात असताना त्यांना दिसली. त्यांनी तात्काळ महावितरणचे कर्मचारी बोलून पडलेली डीपी उभी करून घेतली.व त्या डीपीला स्वखर्चाने वेल्डिंग मारून दिली.त्या नंतर त्या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला याबद्दल परिसरातील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले आहेत . 



थोडे नवीन जरा जुने