किडनीसाठी ‘या’ गोष्टी आहेत हानिकारक निरोगी राहायचे असेल तर ‘या सवयी सुधारा







आरोग्य _
.तुमच्या किडनीसाठी ‘या’ गोष्टी आहेत हानिकारक ; निरोगी राहायचे असेल तर ‘या’ सवयी सुधारा
Kidney Health : तुमच्या किडनीसाठी ‘या’ गोष्टी आहेत हानिकारक ; निरोगी राहायचे असेल तर ‘या’ सवयी सुधारा
Kidney Health पुणे : किडनी हा आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाचा अवयव आहे. रक्तातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यात आणि लघवीद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. (Kidney Health) पण जर हा अवयव नीट काम करत नसेल किंवा तुम्हाला किडनीशी संबंधित कोणताही आजार असेल तर शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेत अडथळा येतो, शरीरात विषारीपणा वाढू लागतो. त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
आपली चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. याशिवाय काही आरोग्य समस्या आहेत यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब देखील किडनीचे आरोग्य बिघडू शकतात.



पुरेसे पाणी न पिणे हानिकारक
मूत्रपिंड अर्थात किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, आपण दिवसभर पुरेसे पाणी पिणे सर्वात महत्वाचे आहे. शरीर चांगले हायड्रेटेड ठेवल्याने मूत्रपिंडांना शरीरातील अतिरिक्त सोडियम आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. मुतखडा टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा देखील उत्तम उपाय मानला जातो.

स्वत:च करू नका औषधोपचार
औषधांचा अतिवापर, वेदना कमी करणारी औषधे, तुमच्या मूत्रपिंडासाठी हानिकारक ठरू शकतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधाचे सेवन करू नये.



जास्त मीठ, साखर हानिकारक
उच्च मीठयुक्त आहारामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. यामुळे तुमची किडनीही खराब होऊ शकते. मूत्रपिंड अन्नातील अतिरिक्त सोडियम योग्य प्रकारे फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे ते क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. मीठाप्रमाणे साखरेचे वाढते प्रमाणही हानिकारक आहे. त्यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच, पण त्याचे प्रमाण जास्त असल्याने किडनीचे आजार वाढण्याचाही धोका असतो.


थोडे नवीन जरा जुने