कोंबडया चोर अटकेत







कोंबडया चोर अटकेत 
पनवेल दि २९ (संजय कदम) : बॉयलर कोंबड्यांसह सिलेंडर व शेगड्यांची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना पनवेल तालुक्यातील खैरणे गावाच्या हद्दीत घडली होती याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघाजणांना ताब्यात घेतले आहे.    


              खैरणे गावाच्या हद्दीत असलेल्या सरदार चिकन शॉप व राजू चिकन शॉप मधील बॉयलर कोंबड्या, सिलेंडर व शेगडी असा मिळून तीन हजार चारशे ऐशीं रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी कोंबडी ठेवण्याचे लोखंडी पिंजऱ्याचे तोडून नुकसान केल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, पोलीस हवालदार महेश धुमाळ, वारंगे, पोलीस शिपाई श्रीनामे आदींच्या पथकाने याप्रकरणी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने आरोपी बाप्पा मंडल (वय ४२, रा. ढोंगऱ्याचा पाडा) व उत्तम सरकार (वय ३३, रा. ढोंगऱ्याचा पाडा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने