पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी शहबाज पटेल यांची नियुक्ती


पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी शहबाज पटेल यांची नियुक्ती  
पनवेल दि . २० ( वार्ताहर ) : पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी तळोजा येथील शहबाज पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई राष्ट्रवादी भवन येथे निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब भाई शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.                       शहबाज पटेल हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील, महिला सरचिटणीस भावनाताई घाणेकर, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष फारूक पटेल,पनवेल प्रभारी जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल यांचे निकटवर्तीय असून राजकारणात यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे गिरवत आहे.पनवेल विभागातून या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष शहबाज पटेल यांनी खा. शरदचंद्र पवार यांचे विचार जोपासत जिल्ह्यात पक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करत, जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल जयंत पाटील, महेबूब भाई शेख व पक्षश्रेष्ठी यांचे आभार मानले.तसेच जिल्ह्यातील सर्व सेलचे प्रमुख यांची भेट घेउन त्यांचे आशीर्वाद घेउन पक्ष संघटना वाढीवण्यासाठी काम सुरु करणार आहे.यावेळी जिल्हा युवक सचिव चाँद शेख युवा नेता श्रेयश भावसर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने