तळोजा फेज १ व तळोजा फेज २ या विभागाला सद्गुरू वामनबाबा महाराज नगर असे नाव देण्याची शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची सिडको कडे मागणी


तळोजा फेज १ व तळोजा फेज २ या विभागाला सद्गुरू वामनबाबा महाराज नगर असे नाव देण्याची शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची सिडको कडे मागणी 
पनवेल दि. २० ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील तळोजा फेज १ व तळोजा फेज २ या विभागाला सद्गुरू वामनबाबा महाराज नगर असे नाव देण्याची शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने सिडको कडे मागणी केली आहे .


 
                     शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिडकोने नव्याने वसविलेल्या तळोजा विभागास तळोजा फेज १ व फेज २ असे संबोधिले जाते. या विभागामध्ये नव्हे तर रायगड व ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदाय रुजविला, जोपासला व वारकरी संप्रदाय वाढविला असे प्रसिद्ध सद्गुरू वामनबाबा महाराज तळोजा विभागात होऊन गेले , त्यांची विचारधारा जतन करण्यासाठी त्यांचे नाव देणे आवश्यक आहे. यापूर्वी या भागातील वारकरी व ग्रामस्थांनी तळोजा व पेंधर मेट्रो स्टेशनला महाराजांचे नाव देण्याची मागणी सिडकोकडे केली होती, मात्र सिडकोने अगोदरच नाव दिल्याने महाराजांचे नाव देता आले नाही तरी वारकरी संप्रदाय व नागरिकांच्या मागणी नुसार या तळोजा विभागाला सद्गुरू वामनबाबा महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे


 .
थोडे नवीन जरा जुने