नरेंद्र मोदी ३२५ ते ३५०+ जागा जिंकून पून्हा २०२४ ला पंतप्रधान होतील in






नरेंद्र मोदी ३२५ ते ३५०+ जागा जिंकून पून्हा २०२४ ला पंतप्रधान होतील - भाऊ तोरसेकर
प्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर ह्यांच्या व्याख्यानाला पनवेलकरांनी दिला उदंड प्रतिसाद

पनवेल : भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने रविवारी (दि. ३०) सायंकाळी ५ वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुप्रसिद्ध पत्रकार व प्रतिपक्ष या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा भाऊ तोरसेकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर व मा सभागृह नेते परेश ठाकूर ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सांस्कृतिक सेल चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन ह्यांच्या टीम ने ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले होते. ह्या कार्यक्रमाला पनवेल च्या नागरिकांनी तसेच 'भाऊ' प्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला.



व्याख्यानाचा विषय होता 'बदलता भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योगदान' भाऊ तोरसेकर ह्यांनी त्यांच्या शैली मध्ये अनेक उदाहरणं, प्रसंग, किस्से सांगत देशात घडत असेलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केले. नरेंद्र मोदी ह्यांची कार्यपद्धती, कामाप्रति व देशाप्रति असलेला त्यांचा प्रामाणिक पणा, चिकाटी ह्या बाबत सामान्य नागरिकांच्या मनातील भावना सांगितल्या. आज देशात वेगाने रास्ते बांधले जात आहेत, वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहत आहेत. ज्याचे भूमीपूजन केले त्याचे उद्घाटन ही 4-5 वर्षाच्या आत केले आणि असे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातले कदाचित एकमेव पंतप्रधान असतील असे भाऊ म्हणाले. आज जगात भारत हा 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. देशात लोकांना एक प्रकारे जिंकण्याची सकारात्मक ऊर्जा जर कुठून मिळत असेल तर त्याचा स्त्रोत हा नरेंद्र मोदी आहे असे ते म्हणाले. 







ह्या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करून झाली. त्या नंतर भा ज पा सांस्कृतिक सेल चे सदस्य वैभव बुवा ह्यांच्या प्रास्ताविक पर निवेदानातून त्यांनी कार्यक्रमाचा एकूण उद्देश लोकांसमोर मांडला. हयानंतर भाऊ तोरसेकर ह्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. ह्यावेळी भा ज पा सांस्कृतिक सेल च्या सदस्या ऋतुपर्णा किरटोणीया हिने भाऊंचे हुबेहूब काढलेले स्केच हे त्यांना भेट म्हणून देण्यात आले. भा ज पा उत्तर रायगड चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी ह्यांचा विशेष सत्कार ह्यावेळी भाजपा सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर अभिषेक पटवर्धन ह्यांनी भाऊ तोरसेकर ह्यांची एका वेगळ्या शैलीत ओळख करून देत त्यांच्या सोशल मीडिया वरील फॉलोवर्सचा आणि इतर आकडेवारींचा वेध घेतला. 



ह्या प्रसंगी मा नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, माजी महापौर कविता चौतमोल, मा उपमहापौर चारूशिला घरत, मा नगरसेवक प्रकाश बिनेदार, रुचिता लोंढे, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रवींद्र जोशी, सुमित झुंजारराव, अमरिष मोकल, गणेश जगताप, चिन्मय समेळ, अमोल खेर, निखिल गोरे, अक्षया चितळे, अंजली इनामदार, विद्या तामखेडे, बबन बरगजे, आदित्य उपाध्ये तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने