दुभाजक आणि पदपथावरील वृक्ष धोकादायक; सिडकोची पर्यावरणगिरीचे पालेमुळे उघडे!







दुभाजक आणि पदपथावरील वृक्ष धोकादायक; सिडकोची पर्यावरणगिरीचे पालेमुळे उघडे!

पनवेल दि. ३० ( वार्ताहर ) : शेती आणि वनराई नष्ट करून सिमेंटचे जंगले उभारणाऱ्या सिडकोने दिखाऊ गिरीसाठी पदपथ आणि दुभाजकांवर वृक्ष लागवड केली. मात्र या झाडांच्या मुळांंना खोलवर रुजता न आल्याने ते उघडे पडले आहेत. त्यामुळे पावसात तसेच सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये हे वृक्ष उन्मळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर वाहन चालक आणि पादचरांनाही एक प्रकारे धोका निर्माण झाला आहे.   



                      सिडकोने पनवेल परिसरामध्ये पिकत्या जमिनी संपादित केल्या. त्या ठिकाणचे वनसंपत्ती ही नष्ट करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रशस्त रस्ते, टोलेजंग इमारती त्याचबरोबर उड्डाणपूल उभारण्यात आले. नागरिकरण आणि औद्योगीकरणात या भागातील वनराई नष्ट झाली. सिमेंटच्या जंगलामध्ये हिरवाई नसल्याने ग्लोबल वार्मिंग चा परिणाम जानू लागला. दरम्यान नागरी वसाहती विकसित करत असताना त्या ठिकाणी झाडांसाठी जागाच सिडकोने ठेवली नाही. जिकडे तिकडे सिमेंटचे इमले उभारण्यात आल्याने मोकळी हवा त्याचबरोबर प्राणवायू मिळेनासा झाला. त्याचा येथील वातावरणावर परिणाम जाणू लागला. सिडकोच्या या धोरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला .या धोरणावर पर्यावरणवादी संघटना सामाजिक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दिखावा म्हणून प्राधिकरणाने वसाहतीमध्ये झाडे लावण्याचा निर्णय घेतला


. मात्र वृक्षारोपणासाठी मोकळी जागा नसल्याने सिडकोने रस्त्यावरील दुभाजके आणि पदपथांवर झाडे लावले. सावली आणि शोभेच्या या झाडांच्या वाढीसाठी माती नसल्याने त्याची मुळे खाली बंदिस्त गटारांमध्ये गेले आहेत. त्याचबरोबर दुभाजकांवरही या झाडांची मुळे वरची वर पसरले आहेत. त्यामुळे सिडको वसाहती मधील झाडांचे पालेमुळे खोलवर रुजलेले नाहीत. परिणामी सुसाट्याच्या वाऱ्यामध्ये किंवा मुसळधार पावसात ही झाडे कोलमडून पडत आहेत. अशा प्रकारचे हजारो झाडे धोकादायक अवस्थेत रस्त्या लगत आणि मध्यभागी एका बाजूला कलंडलेले दिसून येताहेत. ते कधीही उन्मळुन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




थोडे नवीन जरा जुने