द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशन तर्फे 23 व्या जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन.
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील विविध क्षेत्रातील खेळाडू, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच खेळाडू, कलाकांराना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनची स्थापना करण्यात आली. द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएनच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय तसेच जिल्हा स्पर्धेच्या माध्यमातून व मार्गदर्शनातून आजपर्यंत अनेक गुणवंत खेळाडू, कलाकार तयार झाले आहेत
.अनेक खेळाडू, कलाकार यांनी राज्यस्तरीय,राष्ट्रीय स्तरावर सुद्धा उल्लेखनीय कार्य केलेले आहे. अशा या द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनच्या माध्यमातून उरणमध्ये 23 वी जिल्हा स्तरीय वर्षा मॅरेथॉन व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.राजकीय पक्ष विरहित अशी ही संस्था असून सर्वच राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी तसेच स्पर्धेत सहभागी होत असतात.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिना निमित्त द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशन तर्फे रायगड जिल्हा स्तरीय वर्षा मॅरेथॉन 2023 चे आयोजन रविवार दि 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात आले आहे.विशेष विद्यार्थी (सीबर्ड स्कूल स्पेशल चिल्ड्रेन उरण ) यांची मॅरेथॉन स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उरण अभियान दौड सकाळी 8 वाजता, राज्यस्तरिय फूटबॉल स्पर्धा दि 11 ते 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
फुटबॉल स्पर्धा हे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, उरण शहर येथे तर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा बोकडविरा चारफाटा (एन.एम.एस ई. झेड मैदान) पेट्रोल पंपाजवळ येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी क्रीडा विभाग प्रमुख भारत म्हात्रे फोन नंबर - 96195 96456,
शिवेंद्र म्हात्रे - 82916 16826
यांच्याशी संपर्क साधावे व जास्तीत जास्त खेळाडू,युवकांनी कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.
Tags
उरण