पनवेल मध्ये श्रीमद दासबोध ग्रंथावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन


पनवेल मध्ये श्रीमद दासबोध ग्रंथावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन

११ ते १४ ऑगस्ट रोज संध्या.६ः३० ते ८ः३० वाजता तथास्तू हॉल पनवेल येथे..


पनवेल / प्रतिनिधी : - 
अधिक श्रावणमासानिमित्त श्री कपिकूल सिध्दपिठम्, पनवेल केंद्रातर्फे तथास्तू हॉल, पनवेल येथे १००८ श्रीमहंत तपोमुर्ती सद्गुरू वेणाभारती महाराज यांच्या अमृतवाणीतून भाविकांसाठी नवविधा भक्तितून जीवन सार्थकता या प्रवचनमाले अंतर्गत ग्रंथराज श्रीमद् दासबोध या ग्रंथावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानमाला दिनांक ११ ऑगस्ट ते दिनांक १४ ऑगस्ट दरम्यान रोज संध्याकाळी ६ः३० ते ८ः३० या वेळात तथास्तू हॉल, पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच दि.१६ व १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ८ या वेळेत निसर्गोपचार कँपचे आयोजनही करण्यात आले आहे. या कँपमधे आहार मार्गदर्शन, मसाज, फेशियल्स,तसंच स्वदोष निवारण यावर श्री कपिकुल सिद्धपिठमच्या उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांच्याकडून मार्गदर्शन होणार आहे.अधिक श्रावण महिन्यात आलेल्या या संधीचा लाभ भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून घ्यावा,असं आवाहन उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांनी केलं आहे. याचबरोबर पनवेल मधे विविध ठिकाणी गुरूपुजन, सत्संगाचे कार्यक्रम,सत्यनारायण पुजेचे आयोजन करण्यात आले असून अध्यात्मिक साहित्य, निसर्गोपचार,व गुरुदर्शनाकरीता ८२०८३६२९५०, ८३६९८०३०९०, ९३२३४७८६५८ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने