जाणीव एक सामाजिक संस्थेतर्फे गीत रामायण


जाणीव एक सामाजिक संस्थेतर्फे गीत रामायण
पनवेल दि.०७ (वार्ताहर): आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर आधारित सामगंध प्रस्तुत गीत रामायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.                   या कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांना श्री रामाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. 
या वेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, संस्थेचे संस्थापक माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, माजी पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, सुलोचना कल्याणकर, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी युवा मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष प्रसाद म्हात्रे, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, उमेश इनामदार, प्रसाद कंधारे, रूपेश नागवेकर, महेश सरदेसाई, सचिन नाझरे, चंद्रकांत पाटील, प्रितम म्हात्रे, विजय डिसोझा, नरेंद्र सोनावणे, डॉ. एस. टी. गडदे, यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने