तेरा वर्षीय मुलाचे अपनयन





तेरा वर्षीय मुलाचे अपनयन
पनवेल दि.२४ (संजय कदम) : ओवळे फाटा येथे जावून येतो असे सांगुन त्याच्या ओवळे गावातील राहत्या घरातुन गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचे कोणीतरी अज्ञात इसमाने कायदेशिर रखवालीतून अपनयन केल्याची घटना घडली आहे. या घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 




    करण भारत मोरे असे या अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याचा रंग सावळा, उंची ३ फुट ६ इंच, केस काळे बारीक, चेहरा गोल, डोळे काळे तर अंगात निळ्या रंगाचा कॉलरचा टी-शर्ट व निळ्या रंगाची व लाल रंगाच्या पट्ट्या असलेली हाफ पेन्ट असा पेहराव आहे. सदर मुलांबाबत कोणास काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्याशी संपर्क साधावा. 


थोडे नवीन जरा जुने