बाजारपेठांमध्ये राखी खरेदीला आला वेग तर चंद्रयान राखीला वाढती मागणी


बाजारपेठांमध्ये राखी खरेदीला आला वेग तर चंद्रयान राखीला वाढती मागणी
पनवेल दि.२४ (वार्ताहर) : बहिणीचे अतूट नाते असणारा बंधन सण अवघ्या सहा दिवसावर येऊन ठेपला आहे. बाजारपेठांमध्ये राखी खरेदीला वेग आला आहे. गोंडा, सुरेख कलाकुसर, पारंपारिक राख्यां मागणी आहे. लहान मुलांसाठी पुष्पा चित्रपटातील कलाकारांचे चित्र असलेली आणि लाईटवाली घड्याळाच्या राख्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. रंगीबेरंगी राख्या महिलांचे लक्ष वेधून आहेत. तर नागरिकांकडून चंद्रयान राखीला मागणी होत असून चंद्रयान राखी बाजारात दाखल झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

     
                चार रुपयांपासून दीडशे पर्यंतच्या राख्या बाजारांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. कार्ड, घड्याळाची लाईटवाली राखी, डोरेमोन, छोटा भीम, युनिकॉन, मोटू-पतलूसह गोंडा स्पंच, स्टोन राखी, सिल्व्हर प्लेटेट अशा अनेक प्रकारच्या राख्या ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारात दाखल झाल्या आहेत. त्या खरेदीचा उत्साह बाजारात असलेल्या गर्दीनुसार दिसून येत आहे. बाजारात लाईटवाली घड्याळाची राखी दाखल झाली आहे. या राखीसोबत एक पेन्सील मोफत मिळत आहे. या राखीतून शिक्षणाचा संदेश पोहोचविण्याचे काम केले जात आहे. तर ऐतिहासिक चंद्रयान मोहीमच्या यशानंतर नागरिकांकडून चंद्रयान राखीची मागणी होत आहे. विक्रेत्यांनी देखील याची दखल घेत बाजारात चंद्रयान राखी आणली आहे. या राखीला नागरिकांची मागणी होत आहे. दरम्यान वाहतुकीचा खर्च, कच्च्या मालाचे वाढलेले दर अशा अनेक कारणांमुळे राखीच्या किमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेने यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने