पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे शालेय मुलांसाठी ‘स्पोर्ट्स डे’ चे आयोजन
पनवेल दि .२५ (संजय कदम) : मुलांनी टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर राहावे तसेच घराबाहेर जाऊन शारीरिक व्यायाम करावेत या उद्देशाने पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे शालेय मुलांसाठी ‘स्पोर्ट्स डे’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास ७ वेगवेगळ्या शाळेतील मुलांसह दिव्यांग मुलेही सहभागी झाले होते.
आजकाल लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन दिसू लागला आहे. फोनमध्ये यूट्यूब आणि गेम्स कुठे आहेत, ते कसे वापरायचे, हे सर्व मुले काही मिनिटांत शिकतात. म्हणून ते मोबाईलचा जास्त वापर करतात. मात्र मोबाईलच्या अधिक वापरामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांनी टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर राहावे तसेच घराबाहेर जाऊन शारीरिक व्यायाम करावेत या उद्देशाने पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे शालेय मुलांसाठी ‘स्पोर्ट्स डे’ चे आयोजन करण्यात आले होते. या ‘स्पोर्ट्स डे’ मध्ये वेगवेगळ्या ७ शाळांमधील मुलांनी सहभागी होऊन खेळाचा आनंद लुटला. तसेच दिव्यांग मुले देखील या ‘स्पोर्ट्स डे’ मध्ये सहभागी झाले होते.
यावेळी निंबू चमचा, पोती-उडी, धावणे, आर्मी ऍक्टिव्हिटी, बलून गेम या सारख्या मजेदार खेळांमध्ये मुले सहभाग होऊन खेळात दंग झाले होते. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा बसंती जैन, काजल देधिया, पायल कोठारी, प्रीती मुनोथ, आकांशा बांठिया, मयुरी परमार, मनाली परमार, पूजा मार्लेचा, पूजा सोलंकी, पार्टिभा डांगी आदी सदस्यांसह संजय जैन मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय जैन, मोतीलाल जैन, पत्रकार प्रशांत शेडगे, मेवाड महिला मंडळाच्या सदस्या, शिक्षक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. खेळानंतर मुलांना पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.
Tags
पनवेल