तळोजा जेल समोरील तलावात आढळला मृतदेह
तळोजा जेल समोरील तलावात आढळला मृतदेह
पनवेल दि.२५(वार्ताहर): तळोजा जेल समोरील तलावात आज सकाळी एक इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
      तळोजा जेल समोरील तलावात आज सकाळी ३० ते ३५ वयोगटातील धडधाकट मजबूत तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांना दिसतात त्यांची तात्काळ खारघर पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्वरित खारघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला. सदर इसमाचे नाव मयांकसिंग असल्याची प्राथमिक माहीत पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान हा इसम ह्या ठीक का आला होता? व त्याचा घातपात केला कि त्याने आत्महत्या केली याचा शोध खारघर पोलीस करत  आहे
थोडे नवीन जरा जुने