पनवेल दि.०२ (संजय कदम) : शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी कामोठे शहरातील शिवसेना महिला आघाडी नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे आणि महिला आघाडी पनवेल महानगर संघटिका एडवोकेट सुलक्षणा जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे शहरातील शिवसेना महिला आघाडीतील नविन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कामोठे शहर महीला संघटिका अर्चनाताई कोंढारे, कामोठे उपशहर संघटिका सॉ वैशाली राळे, कामोठे उपशहर संघटिका लक्ष्मी साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या
Tags
पनवेल