लायन्स पनवेल सरगम तर्फे वृक्षारोपण

लायन्स पनवेल सरगम तर्फे वृक्षारोपण
पनवेल दि.०३ (संजय कदम) : लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे चिन्मय गौरांग गृह संकुल येथे वृक्षारोपण करण्यात आले. याठिकाणी 200 झाडे लावण्यात आली. पुढील कमीत कमी 3 वर्षे या झाडांची देखभाल करण्यात येईल असे क्लबच्या अध्यक्ष ला. स्वाती गोडसे यांनी सांगितले. 


               याप्रसंगी सचिव ला. संविदा पाटकर, मानदा पंडित, प्रेमेंद्र बहिरा, सुनील देशपांडे, संजय गोडसे उपस्थित होते. या कार्यक्रमाला चिन्मय गौराग गृहसंकुल चे आदिनाथ पाटकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.


थोडे नवीन जरा जुने