जनहित सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्या मुळे टेंभोडे व वाघेरा, साग वाडी रस्त्याची पाहणी







जनहित सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्या मुळे टेंभोडे
व वाघेरा, साग वाडी रस्त्याची पाहणी 
पनवेल वृत्त ०७ ऑगस्ट (साबीर शेख)
पनवेल तालुक्यात अनेक गाव, वाड्या महानगरपालिका क्षेत्रात आल्याने त्यांचा विकास व्हावे यासाठी अनेक प्रकारे नियोजन चालू आहेत .
प्रलंबित नागरी सुविधा उपलब्ध करताना अनेक तांत्रिकदृष्ट्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे प्रशासन व आजी माजी लोकप्रतिनिधी कडून समजते. 



टेंभोडे व वाघेरा, साग वाडी रस्त्याची पाहणी करताना ग्रामस्थांनी जोरदार संताप व्यक्त करत मोठी गर्दी केली होती. 
गावांना रस्ता नसल्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन जगणे असह्य,अडचणीचे व धोकादायक झाले आहे .
वृदापकाळ, वैद्यकीय उपचार , तसेच उपजीविकेसाठी रहदारी करण्यासाठी जीव मुठीत घेऊन त्रास सहन करावा लागत असतो. 
 सदर ठिकाणी प्रशासनाने अनेक वेळा भेट देऊन सुद्धा कायदेशीर मार्गाने नियोजन करत नसल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधी विरोधात नागरिकां मध्ये प्रचंड नाराजी आहे.



यावेळी रायगड जिल्हा अध्यक्षा नीलिमा पाटील यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 
 न्याय मिळवून द्यावा अशी निवेदनात मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. 
माहितीचा अधिकार खाली त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आज टेंभोडे
व वाघेरा व साग वाडी रस्त्याच्या पाहणीसाठी पनवेल महानगरपालिका बांधकाम विभाग अधिकारी वर्गाच्या समक्ष घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली.


यावेळी जनहित सामाजिक संस्थेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा नीलिमा पाटील,पनवेल शहर अध्यक्ष श्रीपत निरगुडा,संदीप पाटील,संतोष भोईर,सुनील गडगे ,संजय पाटील,अनिल म्हात्रे ,यशवंत गडगे ,सोपान पाटील तसेच टेंभोडे
व वाघेरा,साग वाडी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने