अन्यथा संजीवनी इंटरनॅशनल विद्यालयावर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालकांसहीत निषेध मोर्चा काढेल - युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत






अन्यथा संजीवनी इंटरनॅशनल विद्यालयावर युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालकांसहीत निषेध मोर्चा काढेल - युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत
पनवेल दि.०८ (संजय कदम) : ‘ऍक्टिव्हिटी फि’ च्या नावाने पालकांकडून जबरदस्तीने पैश्याची मागणाऱ्या मॅनेजमेंटने आरटीई विद्यार्थांकडुन केलेली वसुली त्वरीत बंद करुन पालकांचे पैसे त्यांना त्वरीत परत करावे अन्यथा युवासेना वतीने आपल्या विरुद्ध पालकांसहीत निषेध मोर्चा काढेल असा इशारा युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांनी खारघर मधील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलला दिला आहे. 

 

  खारघर मधील संजीवनी इंटरनॅशनल विद्यालयात आरटीई योजने अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीच्या पालकांकडून ‘ऍक्टिव्हिटी फी’ च्या नावाखाली बेकायदेशीर पणे प्रत्येकी १२००० रुपये उकळत असल्याची लेखी तक्रार येथील पालकांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी अवचित राऊत यांच्यासह उपविधानसभा अधिकारी अनिकेत पाटील, शहर अधिकारी विनोद पाटील, योगेश महाले, विजय धावसे, अश्विन ससाने, सोहम सुरडकर, दिपक पठारे यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला धडक देत शाळेचे मुख्यध्यापक श्री पांडे आणि व्यवस्थापनेला जाब विचारला.



 तसेच आरटीई कायदयानुसार ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची फि शाळेकडून आकारण्यात येवू नये असे शासनाचे परिपत्रक असल्याची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे मॅनेजमेंटने आरटीई विद्यार्थांकडुन केलेली वसुली त्वरीत बंद करुन पालकांचे पैसे त्यांना त्वरीत परत करावे अन्यथा युवासेना वतीने आपल्या विरुद्ध पालकांसहीत निषेध मोर्चा काढेल असा इशारा दिला. 


थोडे नवीन जरा जुने