पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी/विद्यार्थीनीना वेगवेगळ्या






पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी/विद्यार्थीनीना वेगवेगळ्या विषयातून करण्यात आली जनजागृती 



पनवेल दि. ०७ ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केवाळे हरीग्राम, पनवेल येथील सरस्वती एज्युकेशन फाऊंडेशन विद्याधिराज चॅरिटेबल ट्रस्टचे, कृष्ण अकॅडेमी हायस्कूल या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थी/विद्यार्थीनीना वेगवेगळ्या विषयातून जनजागृती करण्यात आली . 



                         पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक भोईर यांनी उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना गुड टच व बॅड टच याविषयी तसेच अंमली पदार्थाचे मानसिकतेवर होणारे दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे पोलीस विभागांकडून समाजासाठी दिल्या जाणा-या सेवेबाबत माहिती देण्यात आली व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदतीकरीता डायल 112 चे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली, सदर वेळी 15 शिक्षक 200 ते 250 विद्यार्थी उपस्थित होते.
 
थोडे नवीन जरा जुने