काशिनाथ जाधव : प्रतिनिधी पाताळगंगा : १६ ऑगस्ट,
कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगांव,ह्या शाळेचे जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे या मोठे नुकसान झाले होते,शाळेची पत्रे चक्री वादळामुळे उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांना समाज मंदिर पौध येथे शिक्षण घ्यावे लागत होते.मात्र आंबिवली येथिल असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा गम्प्रो ड्रिलींग फ्ल्युईड्स प्रा. लि.ढेकू कर्मचारी यांनी तातडीने ही समस्या ह्या कंपनीचे मालक आनंद गुप्ता यांच्या कडे बोलले त्यांनी तातडीने सिमेट ची पत्रे,लादि रंगरगोटी प्लास्टर ,ग्रील करण्यात आली.
शाळेसाठी केलेले कार्य अतुलनीय असल्यामुळे मालक उपस्थित न राहिल्यामुळे १५ ऑगस्ट चे झेंडारोहन प्रदिप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कोकण एज्युकेशन सोसायटी माजगांव येथे या परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात.त्यांस विविध प्रकारच्या शाळेय साहित्य, विद्यार्थ्यांची अडचण होवू नये, यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते औद्योगिक क्षेत्रातील मालक, व्यवस्थापक,विविध संस्थासातत्याने मदत करीत असतात.यामुळे त्यांच्या शिक्षणांचा साहित्य घेण्याचा भार कमी होत आहे.यामुळे पालकांच्या खिशाला बसणारी झळ कोठेतरी कमी होत आहे शाळेच्या विकास करण्यासाठी सातत्याने प्रत्येक जण पुढाकार घेत असतो.मात्र प्रदीप जाधव यांनी पावसाळ्यात झालेली शाळेची दुरवस्था संदर्भात,गम्प्रो ड्रिलींग फ्ल्युईड्स प्रा.लि.ढेकू यांच्या कडे या शाळेची समस्या सांगितली असता,कंपनीचे मालक आनंद गुप्ता यांनी तातडीने या शाळेची संपूर्ण खर्च करुन ही शाळा नावीन्यपूर्ण बनविली त्यांनी केलेले सहकार्य अतुलनीय असल्यामुळे. यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे यावेळी या शाळेचे चेरमेन सुर्याजी ( भाऊ ) पाटील,मुख्याध्यापक गौतम कांबळे तसेच ग्रामस्थ शाळेय कमिटी अदि उपस्थित होते.
Tags
पाताळगंगा