विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वाटप,सरपंच गौरी गडगे यांचा पुढाकार






विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वाटप,सरपंच गौरी गडगे यांचा पुढाकार


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १५ ऑगस्ट,
            
             रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथे असलेले मुख्याध्यापक सुभाष राठोड, यांनी शाळेचा कायापालट करून विद्यार्थी आणी पालक वर्गामध्ये या मराठी शाळेविषयी उत्तम असा दृष्टीकोण तयार केला आहे. विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती आणी त्यांचा शरिराच्या कसरतीसाठी उपयोग कसा होतो यांचे मार्गदर्शन देण्यात आले.मात्र प्रत्येकाला खेळाचे ड्रेस वेगळे असावे या दृष्टीकोणांतून त्यांनी ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सरपंच गौरी गडगे आणी सदस्य - महादेव गडगे यांच्या कडे मागणी केली असतांना तातडीने स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आले. 
             या शाळेचे रुप पालटण्यात राठोड यांचा मोलांचे योगदान ठरत,ग्रामस्थ यांच्या सहकार्याने,आणी श्रमदानातून तसेच कारखानदारी येथिल व्यवस्थापक यांच्या मदतीने शाळेचे रंगरंगोटी,विविध प्रकारचे चित्र,अंक,एबीसीडी अन्य काही हा भिंती रंगविण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी शिवाय खेळ खेळल्यामुळे शारीरिक कसरत होत असते.मोबाईल पासून थोडा वेळ दुर जावे,यासाठी खेळाचे महत्व आणी नियम सांगण्यात आले.


                  त्याच बरोबर,वृक्ष लागवड आणी संवर्धन हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.पौष्टिक तृणधान्य दिवस,पाय-या ची सुधारणा,पंचप्राण प्रतिज्ञा,शाळेय सुशोभीकरण,पाणी पुरवठा,अदि कामे शाळेमध्ये सुरु आहे.आणी विद्यार्थी मनापासून करीत आहे.स्वयं 
              सेविका निकिता गडगे, साक्षी जांभुळकर,मनीषा गडगे,वेदिका गडगे यांचे शाळा व मा.सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या सत्कार करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मा.करुणा रवींद्र ठोंबरे,विषय शिक्षिका ,सरस्वती किरण कवाद, सह शिक्षक वैजनाथ जाधव ,आशा कार्यकर्त्या ज्योती ठोंबरे,पालक गणेश दळवी,गौरी गणेश दळवी, श्रुतिका जांभुळकर,शिक्षण स्वयं सेवक निकिता गडगे,साक्षी जांभुळकर,मनीषा गडगे,वेदिका गडगे उपस्थित होत्या.


थोडे नवीन जरा जुने