माझी माती हैमाझा देश या अभियानांतर्गत उरण नगर परिषद तर्फे उरणमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन.







माझी माती, माझा देश' या अभियानांतर्गत उरण नगर परिषद तर्फे उरणमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन.




उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )'माझी माती, माझा देश' हे अभियांनांतर्गत उरणमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन केले होते.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर- वीरांगणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशभरात "माझी माती, माझा देश" हे देशभक्तीपर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.



याचाच एक भाग म्हणून उरण नगरपरिषदेच्या सौजन्याने 'माझी माती, माझा देश' अभियानांतर्गत शिलाफलकाचे लोकार्पण व शहीद वीरांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. तसेच कोविड काळात "कोविड योद्धा" म्हणून सेवा बजावली त्याबद्दल उरण नगरपरिषद शाळेमधील कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांसोबत स्मृतिप्रीत्यर्थ स्थापित शिला फलकाचे अनावरण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले.



तसेच रहाळकर मैदान येथे वृक्षारोपण करुन अमृत वाटिका तयार करण्यात आली.सदर कार्यक्रमास राहुल इंगळे- मुख्याधिकारी उरण नगरपरिषद, लेखपाल - सुरेश पोस तांडेल , नगर रचनाकार सचिन भानुसे, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी,कर निरीक्षक संजय ढापसे,आरोग्य निरीक्षक हरेश तेजी तसेच माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, गटनेते रवी भोईर, नगरसेवक कौशिक शाह,नगरसेवक राजू ठाकूर, जसिम गॅस व उरण नगरपरिषद मधील अधिकारी/ कर्मचारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षा रोपण केले.


थोडे नवीन जरा जुने