राजिप शाळा वडगांव येथिल ध्वजारोहण विद्यार्थीनीच्या हस्ते,मान्यवरांकडून शालेय व्यवस्थापक यांचे कौतुक







राजिप शाळा वडगांव येथिल ध्वजारोहण विद्यार्थीनीच्या हस्ते,मान्यवरांकडून शालेय व्यवस्थापक यांचे कौतुक 

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : १६ ऑगस्ट,

          आज १५ ऑगस्ट च्या दिवशी ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठात नागरिक,अथवा राजकीय पुढारी यांच्या हस्ते होत असते.मात्र जिल्हा परिषद शाळा वडगाव येथिल ध्वजारोहण यांच शाळेत शिक्षण घेत असलेली सातवी मध्य असणारी अदिवासी समाजातील मयुरी दशरथ कातकरी हिला हा मान देण्यात आल्यांने शाळेय व्यवस्थापक आणी शिक्षक यांचे कौतुक करण्यात येत आहे.आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांस दिल्यामुळे मुलामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्यांचे पहावयास मिळाले.


                भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न होत असताना भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद वडगाव येथे आज ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो.पण मुख्याध्यापक- सुभाष राठोड यांनी कोणताही मोह न बाळगता स्वयंस्फूर्तीने विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करून घेत असतांना ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून अभिनंदन केले.यामुळे आज या गोष्टीची पंचक्रोशीत सकारात्मक चर्चा ऐकण्यास मिळाली.



           यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वडगाव सरपंच गौरीताई गडगे,सदस्य महादेव गडगे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा करुणा रवींद्र ठोंबरे,उपाध्यक्ष राजश्री नरेंद्र जांभुळकर,पोलीस पाटील - मनमोहन गडगे,सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ते वसंत ठोंबरे,माजी सरपंच संतोष ठोंबरे,शिक्षक सरस्वती कवाद,वैजनाथ जाधव,स्वयं सेविका शिक्षिका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर,मनीषा गडगे,वेदिका गडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर नरेंद्र जांभुळकर यांनी साऊंड व्यवस्था तर श्रुतिका जांभुळकर हिने सजावट व्यवस्था पाहिली,मंथन ठोंबरे याने खाऊ व प्रभात फेरीचे नेतृत्त्व केले तर कैवल्य जांभुळकर याने संचलन केले.




थोडे नवीन जरा जुने