शीर्षक नाही

श्री बल्लाळेश्वर देवस्थनाच्या वतीने श्री विष्णू सहस्रनाम पठणाचा कार्यक्रम
पनवेल दि.०२ (संजय कदम) : श्री बल्लाळेश्वर व श्री रामजी संस्थान यांच्यावतीने अधिकमास प्रित्यर्थ दररोज सायंकाळी श्री विष्णू सहस्रनाम पठणाचा कार्यक्रम सुरु आहे. या यागात हवन करण्यास इच्छूक असलेल्या भाविकांनी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.  


 
                 श्री बल्लाळेश्वर व श्री रामजी संस्थान यांच्यावतीने अधिकमास प्रित्यर्थ दररोज सायंकाळी श्री विष्णू सहस्रनाम पठणाचा कार्यक्रम सुरु आहे. त्याचे समाप्ती प्रित्यर्थ देवस्थानतर्फे बुधवार १६ ऑगस्ट रोजी पुरुषोत्तम याग (श्री विष्णू सहस्रनाम हवन) करण्याचे योजिले आहे. या यागात हवन करण्यास इच्छूक असलेल्या भाविकांनी (स्त्री/पुरुष) अधिक माहितीकरीता खालील व्यक्तिंशी १० ऑगस्ट पर्यंत शैलेश करंदिकर (मो. ९८३३४७८७९०), अनिलकुमार कुळकर्णी (मो. ९३२४९५९०२), वामन साठे (मो. ८१०४२४९४१७) किंवा श्रीकृष्ण वैद्य (मो. ८१०८४८४३४८) यांच्याशी संपर्क साधावा. 


थोडे नवीन जरा जुने