रायगड जिल्हा सेवा दल काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक उत्साहात संपन्न.






रायगड जिल्हा सेवा दल काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक उत्साहात संपन्न.


विविध मान्यवरांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन.

उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या पण काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते घाबरले नाहीत.पाठिमागे हटले नाहीत. आजही काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तेवढ्याच जोमाने व उत्साहाने काम करत आहेत.मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष झाल्यापासून जिल्हाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेउन काँग्रेसचा तळागाळात गावोगावी प्रचार करत आहे.



महागाई,खाजगीकरण, जातीयवाद आदि कारणामुळे जनता मोदि सरकारला कंटाळली आहे.त्यामूळे लोकामध्ये काँग्रेसची चांगली प्रतिमा आहे.2024 मध्ये लोकांना काँग्रेस सत्तेत पाहिजे आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने तन मन लावून तळा गाळात जावून, गावोगावी जाऊन काँग्रेसचा प्रचार प्रसार केला पाहिजे. गेल्या 60 वर्षात काँग्रेसने काय केले, कोणकोणती कामे केली ही जनतेत जाऊन सांगित‌ले पाहिजे. 2024 ला काँग्रेसचाच विजय असणार आहे असे सांगत राष्ट्र सेवा दल ही समाजात सांगले काम करत आहे. पक्षाच्या जडण घडण मध्ये राष्ट्र सेवा दलाचा महत्वाचे योगदान आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा महेंद्रशेठ घरत यांनी शेलघर येथे केले.




रायगड जिल्हा सेवा दल काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक स्व.जोमा नारायण घरत सभागृह शेलघर येथे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सदर आढावा बैठकित उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना अखिल भारतीय सेवा दल कमिटीचे राष्ट्रीय महासचिव लालजी मिश्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलचे प्रवक्ता राकेश शेट्टी , अखिल भारतीय काँग्रेस सेवा दल कोऑडीनर दानिश लांबे,रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत,रायगड जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले



.उरण तालुका सेवादल अध्यक्ष गोपीनाथ मांडेलकर, रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संध्या दीपक ठाकूर, खालापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पारंगे, कोकण विभागीय मच्छीमार नेते मार्तंड नाखवा, उरण तालुका काँग्रेस इंटक कमिटीचे अध्यक्ष संजय ठाकूर, उरण तालुका उपाध्यक्ष महेंद्र मुंबईकर, चिटणीस गणेश पाटील, जासई विभागीय महिला अध्यक्ष वंदना म्हात्रे, चाणजे विभागीय अध्यक्ष प्रीती पाटील, महिला सेवादल कार्यकर्त्या रेखा धनश्री मॅडम, केगाव अध्यक्ष सदानंद पाटील, केगाव विभागीय सेवादल सदस्य ज्ञानेश्वर पाटील, चिटणीस गणेश पाटील, जासई गाव अध्यक्ष रमेश पाटील, ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष उमेश भोईर ,काँग्रेस उरण तालुका सेवादल उपाध्यक्ष सुनील काटे ,जेष्ठ काँग्रेसचे नेते जयवंत पाटील, भेंडखळ ग्रामपंचायतचे उपसरपंच दिपक ठाकूर, काँग्रेसचे युवा नेते श्रेयस घरत,विवेक म्हात्रे, आदित्य घरत,



 सेवा दल सदस्य रामकृष्ण म्हात्रे, महालण काँग्रेस कमिटी अध्यक्ष व जसखार ग्रामपंचायत सदस्य हेमंत ठाकुर, काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंत घरत आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत सेवा दलाचे कार्य, सेवा दल काँग्रेस साठी काय काय कार्य करते याची माहिती देण्यात आली.सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याकरिता सेवा दलने काय काय करायला पाहिजे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.सेवादल किती महत्वाचे आहे हे विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सांगितले.सदर कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन काँग्रेसचे रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांनी केले. या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.


थोडे नवीन जरा जुने