देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी केले गजाआड






देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी केले गजाआड
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे यांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेेल्या दोघा जणांना मुुंब्रा पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे मोठ्या प्र्रमाणात इतर गुन्हेगारी उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेे.



मुंब्रा पोलीस ठाण्याचे एन.डी.पी.एस. पथकास कौैसा पेट्रोल पंप कौसा मुंब्रा या ठिकाणी दोन इसम देशी बनावटीचेे पिस्टल विक्री करीता घेवून येणार असल्याची माहिती मिळताच वपोनि निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक नितीन भोसले, पो.अंमलदार धनंजय घोडके, प्रमोद जमदांडे, अजित येळे, सुकदेव देवकर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी इसम मोहम्मद हाशीम इस्त्राईल खान (29 रा.फत्तेहपूर) व त्याचा सहकारी मोहमद रजा मोहमद वजी खान (24 रा.फत्तेहपूर) या दोघांंना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्जिन, जीवंत काडतुसे तसेच त्यांच्या सोबत असलेली बुलेट मोटार सायकल असा मिळून जवळपास 1 लाख 46 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले करीत आहेत.



थोडे नवीन जरा जुने