उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई येथे केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे १४ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यालयात विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वज स्तंभची पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले
विद्यालयाचे प्राचार्य शिक्षण संस्थेचे लाइव वर्कर अरुण घाग यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले याप्रसंगी नरेश घरत, रघुतात्या, जासई ग्रामपंचायतचे सरपंच संतोष घरत,ग्राम विकास अधिकारी पालकर सर ,अमृत ठाकूर ,धर्मदास घरत, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक
नुरा शेख,उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस., पर्यवेक्षिका म्हात्रे एस. सी, संदीप गाताडी, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतुल पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून सांगता केली.
Tags
उरण