चैतन्य नवनीत पाटील याचे सुयशउरण दि 15(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील धुतुम येथील सामाजिक कार्यकर्ते स्वांतत्र्य सेनानी, स्वर्गीय रामदास शेठ नारायण ठाकूर यांचे पणतू व नवनीत शांताराम पाटील यांचे सुपुत्र चैतन्य नवनीत पाटील राहणार मोरावे याने यूजीसी नेट परीक्षेत फिजिक्स या विषयात राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावला आहे .या आधी त्याने बिट्स पिलानी या नामांकित संस्थेतून एम.एससी फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक या विषयात इंजिनिअरची पदवी घेतली आहे. त्याने पुढे फिजिक्स या विषयात संशोधन करायचे ठरवले आहे.चैतन्य पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवर फिजिक्स विषयात तृतीय क्रमांक पटकविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेक मान्यवरांनी त्यांना व्हाट्सअप, फेसबुक या सारख्या सोशल मीडिया द्वारे त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.


थोडे नवीन जरा जुने