भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )भेंडखळ ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने ७७ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत भेंडखळ हद्दीमध्ये आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमत: अमृत सरोवर तलाव भेंडखळ येथे ग्रामपंचायत सदस्य लिलेश्वर गजानन भगत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. त्यानंतर अंगणवाडी कार्यालय भेंडखळ येथे ग्रामपंचायतिच्या सदस्या शितल जिवन ठाकूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यालय भेंडखळ येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजिता मिलिंद पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच पी.एन.पी. माध्यमिक शाळा भेंडखळ येथील शाळेचे चेअरमन के. एस. ठाकूर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. आणि प्राथमिक शाळा भेंडखळ येथे भेंडखळ गावाचे सुपुत्र माजी सैनिक प्रशांत भगत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला.


 सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या समवेत प्रभात फेरी काढून करण्यात आली. माजी सौनिक, डॉक्टरेट पदवी मिळवलेली गावातील सुकन्या, तसेच गिर्यारोहन करून गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविणारी सुकन्या, शैक्षणिक कार्यामध्ये नाव लौकिक करणारे सुपुत्र तसेच रायगड भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर व ग्रामपंचायत भेंडखळ कार्यालमध्ये मुख्य लेखनिक म्हणून काम करणारी कर्मचारी यांची पदोनित्ती रायगड जिल्हा परिषद येथे झाल्याबद्दल उपस्थित या सर्वांचे सत्कार करण्यात आले.भेंडखळ ग्रामपंचायतचे सरपंच मंजिता मिलिंद पाटील, उपसरपंच दिपक दामोदर ठाकूर, सर्व सदस्य अजित वासुदेव ठाकूर, लिलेश्वर गजानन भगत, अभिजीत देवानंद ठाकूर, सोनाली कौस्तुभ ठाकूर, शितल जिवन ठाकूर, संगीता मेघश्याम भगत, स्वाती संतोष पाटील, स्वाती महेंद्र घरत, अक्षता अनिल ठाकूर, श्रीमती. प्राची गणेश पाटील, ग्रामविकास अधिकारी दिलीप महादेव तुरे, तसेच ग्रामपंचायतीची कार्यालयीन कर्मचारी दिपाली मते आणि सर्व कार्यालयीन सहकारी यांच्या उपस्थित कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.थोडे नवीन जरा जुने