पनवेलमधील सुकापूर परिसरात विकासाचीविविध कामांचे शानदार उद्घाटन आणि भूमिपूजन – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ







पनवेलमधील सुकापूर परिसरात विकासाची गंगा
विविध कामांचे शानदार उद्घाटन आणि भूमिपूजन
– आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ



पनवेल (प्रतिनिधी) पनवेलजवळील पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. सुकापूरमधील नागरिकांना वाढदिवसाची ही अनोखी भेट आहे.


या कार्यक्रमांना भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, माजी पं.स.सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, सरपंच योगिता पाटील, ज्येष्ठ नेते चाहूशेठ पोपेटा, किशोर सुरते, सुनील पाटील, जनार्दन पाटील, हनुमान खुटले, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उदय म्हसकर, आत्माराम पाटील, नामदेव पोपेटा, परशुराम पाटील, महेश केणी, आनंद म्हसकर, प्रमोद सावंत, संदीप वाघमारे, प्रिया वाघमारे, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच दत्तात्रेय भगत, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, महेश पाटील, चेतन केणी, पुष्पा म्हसकर, अनिता पाटील, प्राची जाधव, माजी सदस्य योगेश पाटील, संजय पाटील, भरत म्हसकर, शिवराम शेळके, जनार्दन पाटील, पंढरी ठाकूर, रूपेश पाटील, राहुल पोपटा, राकेश भुजबळ, नारायण पाटील, सुरेश मुकादम, डॉ. कृष्णा देसाई, अनिकेत कसाल, अनिकेत पाटील, जयसिंग वाघमारे, सादिक सय्यद, रूपेश यादव, ग्रामविकास अधिकारी सुदीन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, आजूबाजूच्या सोसायट्यांचे अध्यक्ष, सेक्रेटरी, ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


या वेळी पाली देवद (सुकापूर) येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, प्रभाग क्रमांक पाचमधील वरदविनायक सोसायटी ते बालाजी मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व एकनाथ भोपी निवास ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता यांचे उद्घाटन, तर एक्स्प्रेस वे पुष्पश्री सोसायटी ते जरीमरी मंदिरपर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण, समृद्धभूमी सोसायटी येथील रस्ता काँक्रीटीकरण व मालेवाडी बसस्टॉप ते साक्षी पार्क 2पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण यांचे भूमिपूजन झाले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, राज्य शासनाचा १५ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती निधी अशा वेगवेगळ्या आस्थापनांचे या विकासात योगदान आहे.




थोडे नवीन जरा जुने