पनवेल दि.०९ (संजय कदम) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांचा वाढदिवस संपन्न झाला. या वाढदिवसानिमित्त राजिप शाळा वडघर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे , मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमित हिरवे , महासचिव अशोक वाघमारे, कार्याध्यक्ष बाळाराम जाधव, पक्षाचे नेते अरुण पवार, अरुण जाधव , आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते काकासाहेब खंबाळकर , ठाणे महानगरपालिकेचे माजी सभापती भैय्यासाहेब ईंदीसे , त्याचप्रमाणे पेण येथील उद्योगपती मयूर शेठ वनगे, ठाणे येथील कार्यकर्ते हिरामण सुर्वे, पनवेल येथील उद्योगपती राजेश खुटले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार एएससी कॉलेजचे प्राचार्य गणेश ठाकूर व सुधागड हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र पालवे यांच्या हस्ते करण्यात आला.
शासकीय विश्रामगृह पनवेल येथे पक्षाच्या वतीने महेश साळुंखे यांचा वाढदिवस संपन्न झाला त्या वेळी पनवेल महिला आघाडीच्या कार्यकर्त्या , त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, पेण तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व मुंबई येथील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळेला भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक नितीन पाटील, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते अरुण कांबळे उपस्थित होते . विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते व कार्यकर्ते यांनी महेश साळुंखे यांना वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व नेते मंडळींनी आपल्या शुभेच्छा पर भाषणांमध्ये सांगितले की महेश साळुंखे हे वर्षभर काही ना काही सामाजिक कार्यक्रम हे संपन्न करीत असतात . समाजा विषयी त्यांची असलेली बांधिलकी बघून ते वेगवेगळ्या घटकांना मदत करत असतात.
आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असलेला हा एकमेव कार्यकर्ता आहे की जो संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना मदत करत असतो . आणि ही सर्व मदत ही निस्वार्थी असते त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमाला सर्व स्तरातील लोकांचे आशीर्वाद लाभतात. आणि भविष्यात त्यांची अशीच राजकीय वाटचाल चालू राहो अशा त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
पनवेल