पनवेल, दि.9 (संजय कदम) ः झाडाच्या फांद्यामध्ये कित्येक तास अडकलेल्या मांजरीचा जीव पोटे कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे बचावला आहे.
पनवेल शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटी येथे पोटे कुटुंबिय वास्तव्यास असून त्यांच्या घरासमोर असलेल्या एका डेरेदार वृक्षामध्ये फांद्याच्या बेचक्यात जावून एक मांजर अडकली होती. तिला खाली उतरता येत नव्हते. त्यात पाऊस पडत असल्याने झाड सुद्धा ओले झाले होते. अनेक वेळ एकाच ठिकाणी हे मांजर बसल्याचे पाहून प्रेम पोटे यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली व त्यांनी याबाबतची माहिती त्यांचे वडील निलेश पोेटे यांना दिली. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पनवेल अग्नीशमन दलाला दिली व आपल्या दुुकानातील दोन कामगार घेवून ते सुद्धा त्या ठिकाणी आले. तेवढ्या वेळेत अग्नीशमन दलाचा बंब देखील त्या ठिकाणी पोहोचला व त्यांनी अत्यंत सुरक्षितरित्या झाडात अडकलेल्या मांजरीला सुखरुप बाहेर काढले.
Tags
पनवेल