लोकांचा समस्या सोडवण्यासाठी त्यांना कोठे मिळतो वेळ?









लोकांचा समस्या सोडवण्यासाठी त्यांना कोठे मिळतो वेळ?
आमचे नेते, सरकार आणि विरोधी पक्षनेते
स्वतःचा स्वार्थी कामात आहेत मग्न!
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी
पत्रकारांचे आंदोलन



मर्म दृष्टी वृत्तसेवा & डिजिटल न्युज 

नवी मुंबई_ आज मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता महामार्गावर वाकण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. 

मुंबई गोवा महामार्ग देशातील महत्वाचा महामार्ग आहे. मुंबई गोवा महामार्ग मुंबई आणि कोकण ला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. लाखों कोकणवासी याच या मार्गाने प्रवास करताना दिसून येते. परंतु हा महामार्ग नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे.
 अनेक प्रयत्न करूनही महामार्गाच्या कामाला गती मिळू शकलेली नाही. सध्या महामार्गावर खड्डे पडले आहेत, वडखळ ते इंदापूर या मार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे.
 प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत, परंतू आमच्या मायबाप सरकारला
लोकांचा समस्या सोडवण्यासाठी कोठे मिळतो वेळ? आमचे नेते, सरकार आणि विरोधी पक्षनेते स्वतःचा स्वार्थी कामात आहेत मग्न!




 यांचा वेळ एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, सभा मीटिंग , स्वार्थासाठी आंदोलनं यातच यांचा वेळ जातो.यांना जनतेचे हाल, समस्या याच काही देणेघेणे नाही असे वाटते.
महामार्गाच्या या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख, मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला व बालकलयाण मंत्री आदिती तटकरे यांना एसएमएस पाठविण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने