नेक्सस सीवूडचा स्वातंत्र्यदिन विशेष मुलांसह Atypical Advantage च्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम १२ ऑगस्ट रोजी मॉलमध्ये रंगणार अनोखी मैफलनेक्सस सीवूडचा स्वातंत्र्यदिन विशेष मुलांसह
- Atypical Advantage च्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम
- १२ ऑगस्ट रोजी मॉलमध्ये रंगणार अनोखी मैफल
प्रतिनिधी
नवी मुंबई येथील नेक्सस सीवूड हा मॉल आपल्या अनोख्या उपक्रमांसाठी ओळखला जातो. सण असो वा राष्ट्रीय उत्सव, या मॉलमधील विशेष कार्यक्रम ग्राहकांचंच नाही, तर इतरांचंही लक्ष वेधतात. आता स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नेक्सस सीवूड असाच एक उपक्रम राबवणार आहे. त्यासाठी त्यांना Atypical Advantage या संस्थेची मदत मिळणार आहे. १२ ऑगस्ट रोजी विशेष नेक्सस सीवूड मॉलमध्येच एक अनोखी मैफल रंगणार असून त्यात विशेषदृष्ट्या सक्षम मुलं आपलं संगीतातील कौशल्य दाखवणार आहेत.नेक्सस सीवूड हा नवी मुंबईतील सर्वात मोठा मॉल असून दर सणाला किंवा खास प्रसंगी या मॉलमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. या हटके उपक्रमांना इथे येणाऱ्या ग्राहकांचाही प्रतिसाद मिळतो. या स्वातंत्र्य दिनासाठी त्यांना Atypical Advantage या संस्थेची साथ लाभली आहे. Atypical Advantage या संस्थेद्वारे शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तींच्या कलागुणांना आणि कौशल्यांना वाव दिला जातो. संगीताद्वारे सर्वसमावेशकता साधण्याचा प्रयत्न नेक्सस सीवूड आणि Atypical Advantage एकत्रितपणे करणार आहेत.Atypical Advantage चे गायक आपली कला सर्वांसमोर सादर करतील. दीपक बेडसा आणि नितीश सोनावणे हे दोन कलाकार उडान एण्टरटेन्मेंट या ब्रँडशी जोडले गेले असून दोघेही उत्तम गायक आणि पियानो-कीबोर्ड वादक आहेत. तेदेखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सणासुदीच्या प्रसंगी आम्ही असे उपक्रम आयोजित करण्यावर भर देतो. या उपक्रमांद्वारे समाजातील सर्वच घटकांमधील कलागुणांना वाव मिळावा, हा आमचा हेतू असतो. या विशेष मुलांमध्ये दडलेले कलागुण जगासमोर यावेत, त्यांना योग्य व्यासपीठ मिळावं, यासाठीच आम्ही Atypical Advantage यांच्यासह हा उपक्रम राबवत आहोत. या मैफिलीची आठवण ग्राहकांच्याच नाही, तर आमच्याकडे असलेल्या दुकानदारांच्या मनातही कायमची गोंदली जाईल, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया नेक्सस सीवूडचे सीओओ जयेन नाईक यांनी दिली.

आमच्या कलाकारांसाठी ही खूप मोठी संधी असून या संधीचं सोनं करण्यासाठी आमचे सर्वच कलाकार तत्पर आहेत. सर्वसमावेशकता आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या आवाजाला, कलागुणांना तेवढंच महत्त्व आहे, ही बाब या उपक्रमाद्वारे अधोरेखित होईल, असं Atypical Advantage सहसंस्थापक गीतिका मेहता यांनी स्पष्ट केलं.


थोडे नवीन जरा जुने