६० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग रेल्वे आरपीएफने प्रवाश्याला मिळवून दिली परत६० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग रेल्वे आरपीएफने प्रवाश्याला मिळवून दिली परत
पनवेल दि.०१ (संजय कदम) : खगरपूर ते पनवेल रेल्वे प्रवास करत असताना ६० हजार रुपयाचा मुद्देमाल असलेली बॅग विसरलेल्या प्रवाश्याला पनवेल रेल्वे आरपीएफने त्याची बॅग परत मिळवून दिली. बॅग मिळण्याची अत्यंत धुकट आशा असतानाही प्रवाश्याला त्याची बॅग मुद्देमालासह परत मिळाल्याने त्याने आरपीएफचे आभार मानले.  सुमन कुमार पात्रा (वय 34, रा. पश्चिम बंगाल) हे आपल्या कुटुंबासह सांतरागाछी - पुणे हमसफर एक्सप्रेसने खरगपूर ते पनवेल प्रवास करत असताना पनवेल स्थानकात त्यांची ट्रेन आल्यानंतर ते आपल्या सामान व कुटुंबासह उतरले मात्र घाईगडबडीत ते आपली सोन्याची वस्तू, महत्वाची कागदपत्रे व रोख १० हजार असे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली हॅन्डबॅग रेल्वेमध्येच विसरले. हि गोष्ट त्यांना रेल्वे पुढे गेल्यानंतर लक्षात येताच त्यांनी पनवेल रेल्वे आरपीएफकडे याबाबत सविस्तर सांगितले. तात्काळ पनवेल रेल्वे आरपीएफने कर्जत आरपीएफकडे याबाबतची सूचना देऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार सदर ट्रेन कर्जत स्थानकात पोहोचताच हेड कॉन्स्टेबल रामजीत कनोजिया व हेड कॉन्स्टेबल व्हीके तिवारी यांनी सदर डब्यात जाऊन बॅग ताब्यात घेतली. त्यांनतर आवश्यक सोपस्कार करून बॅग प्रवाश्याला परत दिली. बॅग मिळण्याची अत्यंत धुकट आशा असतानाही प्रवाश्याला त्याची बॅग मुद्देमालासह परत मिळाल्याने त्याने आरपीएफचे आभार मानले. 


थोडे नवीन जरा जुने