शिवसेनेच्या पाठपुरावाला यश; कळंबोलीतील मुख्य रस्ते होणार काँक्रीट






शिवसेनेच्या पाठपुरावाला यश; कळंबोलीतील मुख्य रस्ते होणार काँक्रीट
पनवेल दि.०१ (वार्ताहर) : कळंबोली वसाहतीतील रस्त्यांच्या दुरावस्थेवर मात्रा म्हणून या ठिकाणचे मुख्य रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. या पक्षाचे शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी केलेल्या पाठपुराव्याला अंशता यश मिळाले आहे. पावसाळ्यानंतर याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.



                 कळंबोली वसाहतीमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ही कॉलनी समुद्रसपाटीपासून साडेतीन मीटर खाली असल्याने. कमी पावसातही वसाहत जलमय होते. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होते. सध्या अंतर्गत रोडची एक प्रकारे चाळण झाली आहे. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव शिवसेना शिंदे गटाचे कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक यांनी दिला होता. जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका क्षेत्रातील विविध प्रश्नांसंदर्भात सर्व शहर प्रमुखांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी कळंबोलीतील रस्त्यांच्या स्थितीबाबत तुकाराम सरक यांनी प्रशासकांचे लक्ष वेधले त्यानुसार कळंबोलीतील मुख्य रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचा आमचा मानस असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले. याशिवाय वसाहतीत पाण्याअभावी बंद पडलेले सार्वजनिक शौचालय, क्रीडांगणांचा अभाव, शाळांनी बंदिस्त केलेले मैदानी, मल: निसारणाची समस्या, अवजड वाहनांची पार्किंग, समाज मंदिर नसल्याने



 सर्वसामान्यांची होणारी गैरसोय, पदपथांची दुरावस्था या व इतर समस्यांबाबत तुकाराम सरक यांनी आयुक्तांना निवेदन दिले. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली याशिवाय इतर वसाहतीतील विविध प्रश्नांबाबतही चर्चा करण्यात आली.
कोट - कळंबोली वसाहतीमध्ये रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. हा भाग नैसर्गिक दृष्ट्या खाली असल्याने कमी पावसातही पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यात रोड खड्डेमय होतात. यावर उपाययोजना म्हणून जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाठपुरावा करीत आहोत. रस्ते सिमेंट काँक्रीट करावे असा प्रस्ताव मनपा प्रशासनाला दिला होता. आयुक्त गणेश देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत लवकरात लवकर कार्यवाही केली जाणार आहे. मनपाच्या या भूमिकेचे कळंबोलीकरांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. - तुकाराम सरक (शहर प्रमुख, शिवसेना कळंबोली)


थोडे नवीन जरा जुने