शीर्षक नाही






आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त मा.नगरसेवक अ‍ॅड.मनोेज भुजबळ यांचा सामाजिक उपक्रम
पनवेल, दि.5 (संजय कदम) ः आ.प्र्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याला परिसरातील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



त्यामध्ये प्रामुख्याने परिसरातील नागरिकांचे आयुष्यमान भारत(आभा कार्ड)110, श्रम कार्ड 30, आधार कार्ड अपडेट 55 आणि वाटप करणे ही सर्व कामे अ‍ॅड मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली. त्यावेळी उत्तरं रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सुभाष भुजबळ माजी उप नगराध्यक्ष, राकेश भुजबळ, आनंद ढवळे सरपंच शिवकर, मयूर कदम, सुनंदा भुजबळ,प्रीती भुजबळ, सुरेखा भुजबळ, अश्‍विनी भुजबळ,नितीन भुजबळ अजित लोंढे, किशोर शिंदे, चंद्रकांत पट्टेबहाद्दुर,तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने