अपेक्षित काम केदार भगत मित्र परिवार करत आहे-आ.प्रशांत ठाकूरअपेक्षित काम केदार भगत मित्र परिवार करत आहे-आ.प्रशांत ठाकूर 
पनवेल /प्रतिनिधी: केदार भगत आणि मित्र परिवार अपेक्षित कार्य करत असल्याचे प्रतिपादन करत कार्यकर्त्यांनी सुकन्या योजनेसाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन आ.प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप तसेच शिक्षकांना छत्री वाटप कार्यक्रमात केले. 
ते पुढे म्हणाले की, वाढदिवसाला बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका. त्याऐवजी सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे केदार भगत यांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. सामाजिक काम करताना त्याची प्रेरणा इतरांना मिळत असते. असे काम सातत्याने व्हावे. अशा कामातून विद्यार्थ्यांची प्रगतीच होणार आहे. तर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी,
 सुसंस्कृत आणि अभ्यासू आमदार आपल्याला लाभला हे आपले भाग्य आहे.त्यांच्या प्रेरणेने आम्ही कार्य करत असतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आज महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा दर्जा वाढवला जात आहे. हा दर्जा वाढतच रहावा. तर केदार भगत हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असतात. नागरिकांच्या मदतीला धावणारा हा भाजपचा कार्यकर्ता तरुणांची फौज घेऊन नेहमी सेवा कार्य करत राहो असे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते केदार सुरेश भगत व केदार भगत मित्र परिवार यांनी केले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , भाजपा प्रदेश सदस्य श्रीनंद पटवर्धन, भाजपा तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे , रायगड जिल्हा सरचिटणिस नितीन पाटील, इक्बाल काझी, 

मा. नगरसेविका दर्शना भोईर, मा.नगरसेवक अजय बहिरा, रमेश 
गुडेकर, अभिजित साखरे, भाजप सांस्कृतिक विभाग उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चाचे मयूरेश नेतकर, 
पत्रकार विशाल सावंत, अमित ओझे, राजेशजी बाँठिया,
नवनीत पटेल, शहर चिटणीस अमरीश मोकल, जगदीश गायकर, पत्रकार संजय कदम,फिरोझ शेख, स्वप्नील सोनटक्के, आनंद गायकवाड आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित दसवंते, संकेत दसवंते, सचिन जाचक,योगेश साळवी, नितेश भगत,सचिन भगत,शेषनाथ गायकर, रवी परचे, हर्षद गडगे, संतोष वर्तले, ब्रिजेश बहिरा,प्रमोद भगत, जयेश भगत, हेमंतकुमार भगत,मंदार भगत, उज्वल पाटी, नीता मंजुळे,
,निकिता पाटील, संगीता पोतदार, गीतांजली भगत, सुनीता भगत, योगिता डांगरे, प्रज्ञा भगत,अनिता मढवी, गुलाब राऊत आदींनी प्रयत्न केले.


थोडे नवीन जरा जुने