भाजपाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचा खरा विकास होतोय - ईद्रीस मुलतानी
पनवेल :-
भारतीय जनता पक्षाची भीती दाखवत आजपर्यंत विरोधकांनी मुस्लिम समाजापासून दूर ठेवले.पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकासची फळे मुस्लिम समाज बांधव चाखत आहेत. भाजपा विषयी मुस्लिमांच्या पूर्वीच्या शंका आता दूर झाल्यात. आता पक्षासाठी खरोखरच कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा संधी देऊन मोठे करत आहे.कोकणात आम्ही केवळ एक बैठकीसाठी नव्हे तर तालुका, गाव पातळीवर मुस्लिम समाजाला संघटित करण्यासाठी झटणार आहोत असे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईद्रीस मुलतानी यांनी म्हटले.
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात आज अल्पसंख्यांक मोर्चा कोकण विभागाचा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता
. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुरुवातीला मुलतानी यांच्यासह नवनिर्वाचित उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,प्रदेश सरचिटणीस अतिक खान,तालुकाध्यक्ष अरुणशेट भगत आदींचे दणकेबाज स्वागत करण्यात आले. ढोल-ताशे फटाक्यांची आताशीबाजी तसेच आकाशात शांतीचा संदेश देणारी कबुतरे सोडून जनमाणसात सकारात्मक संदेश दिला गेला. सर्व प्रमुख पाहुण्यांना संपूर्ण व्यासपीठ व्यापणारा अतीभव्य पुष्पहार प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर, अल्पसंख्यांक उत्तर विभाग अध्यक्ष जसीम गैस, अमान अख्तर,माजी नगरसेवक मुकीत काजी आदी सगळ्यांनी प्रदान केला. सय्यद अकबर यांनी त्यांच्या कल्पक भूमिकेतून ईद्रीस मुलतानी आणि अविनाश कोळी यांचा विशेष सत्कार केला. त्यावेळी सगळे वातावरण भाजपमय झाले होते.
सुरुवातीला सय्यद अकबर यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या कामाचे सखोल विश्लेषण प्रस्ताविकात मांडले. त्यांच्या भाषणाने सर्वजण प्रभावित झाले.ईद्रीस मुलतानी यांनी भाजपा अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांमध्ये आपल्या समर्पक भाषणाने जोश भरला.अविनाश कोळी यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. आता भविष्यात अल्पसंख्यांक मोर्चाचे कार्य मंडळ व बूथस्तरावर वाढवावे असे त्यांनी आवाहन केले.अतिक खान यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले.संपुर्ण सभागृह ओथंबून भरले होते. विशेषतः महिला आणि युवकांची संख्या लक्षणीय होती. मेळावा यशस्वी झाल्याचे समाधान सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
Tags
पनवेल