उरण दि 28 ( विठ्ठल ममताबादे) दिनांक 27/8/2023 रोजी उरण शहरातील वीर सावरकर मैदान येथे सत्यम इंटरनेशनल या संस्थेच्या वतीने तालुका स्तरिय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली.सदर स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध वकिल डी. एस.फोगाट व ज्येष्ठ पत्रकार दिलीप कडू यांच्या हस्ते झाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश सिंह,सविता सिंह,आशिष घरत, सुधीर घरत,शेखर पाटील, शेखर म्हात्रे, घनश्याम कडू, कैलास शिसोदिया, हेमंत पाटील, रवि पाटील, महेंद्र कोळी, अली हैदर मुकरी, रमेश टेमकर, आशिष काटदरे, तानाजी कोळी, महेश पाटील, राम चौहान, चेतन फोगाट, शिवम सिंह, विठ्ठल ममताबादे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उरण तालुक्यातून उत्तमोत्तम भावी खेळाडू तयार व्हावेत. उरणचे नावलौकीक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावे या अनुषंगाने आयोजित केलेल्या या एकदिवसीय फुटबॉल स्पर्धेत प्रकूण 12 संघानी सहभाग घेतला
त्यापैकी प्रथम क्रमांक स्पोर्टिंग एफसी, द्वितीय क्रमांक मस्तांग एफसी, तृतीय क्रमांक आर डी एफ सी यांनी पटकाविला.या विज्येत्या टिमचे तसेच सर्व खेळाडूंच्या कौशल्यांचे रसिक प्रेषकांनी तोंड भरून कौतूक केले. उरण मध्ये पहिल्यांदाच सत्यम इंटर नॅशनल या संस्थेच्या माध्यमातून दिनेश सिंह, सविता सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला रसिक प्रेषकांचा उत्तम प्रतिसाद पहायला मिळाला.
Tags
उरण